*पोलीस स्टेशन तळोधी येथील आगामी सण उत्सव निमीत्याने दोन सराईत गुन्हेगार यांना चंद्रपूर जिल्ह्यातून केले हद्दपार.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन तळोधी हद्दीतील हद्दपार इसम १) अक्षय उर्फ सारंगधर दिगांबर संगीडवार, वय २८ वर्ष, रा. सोनापूर, ता. नागभीड. जि. चंद्रपूर याचे विरुध्द पो स्टे तळोधी येथे अवैध रेती चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहे. तसेच हद्दपार इसम २) जनार्धन रघुनाथ मेश्राम, वय ५० वर्ष, रा. चिखलगाव, ता. नागभीड यांचे विरुध्द पो स्टे तळोधी येथे दारूबंदी सदराखाली अनेक गुन्ह्याची नोंद आहे. दोन्ही हद्दपार इसम यांची गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेदिवस वाढत असल्याने अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली परंतु सदर व्यक्तीचा उपद्रव वाढल्याने जनमानसात कायद्याचा वचक राहावा व आगामी सण उत्सव काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नमुद इसमास चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली मा. ठाणेदार सा. पोलीस स्टेशन तळोधी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (१) अन्वये हद्दपार प्रस्ताव सादर केल्याने मा. उपविभागीय दंडाधिकारी, ब्रम्हपुरी यांचे आदेशाने १) अक्षय उर्फ सारंगधर दिगांबर संगीडवार, वय २८ वर्ष, रा. सोनापूर, ता. नागभीड. जि. चंद्रपूर, २) जनार्धन रघुनाथ मेश्राम, वय ५० वर्ष, रा. चिखलगाव, ता. नागभीड जि. चंद्रपूर यांना एक (१) महिन्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.