Saturday, August 29, 2026
spot_img
HomePolice*चंद्रपूर उपविभागातील ६ सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपार*

*चंद्रपूर उपविभागातील ६ सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपार*

*चंद्रपूर उपविभागातील ६ सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपार*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

चंद्रपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी, चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ५६ अन्वये स्वतंत्रपणे तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

*आरोपी नामे*

अ.क्र. तडीपार इसमाचे नाव व पत्ता कालावधी

१. प्रितम धनराज लभाने वय २८ वर्षे रा घुघुस (तीन महिणे)

२. नंदकिशोर रामसागर सोनी वय ५० वर्ष रा. रयतवारी कॉलरी,-चंद्रपूर (सहा महिणे)

३. शंकर नागलु तोकलवार, वय ४७ वर्ष रा. -जलनगर वार्ड, चंद्रपूर (तीन महिणे)

४. अन्सार अलीम खान पठाण वय २५ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर (सहा महिणे)

५. दिनेश किशोर मडावी वय ४० वर्ष रा. जलनगर वार्ड, चंद्रपूर (सहा महिणे)

६. शिवम योगेश रागीट, वय २२ वर्ष रा. बाबुपेठ वार्ड चंद्रपूर (सहा महिणे)

सहाही आरोपी चोरी, घरफोडी, जबर दुखापत करणे, अवैध हत्यार बाळगणे, जुगार खेळणे, अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणे, इत्यादी असे अनेक गंभीर गुन्हे त्यांचेवर दाखल आहेत, त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरीक आणि साक्षीदार न्यायालयात किंवा पोलीसासमोर उघडपणे साक्ष देण्यास घाबरत होते. या गुन्हेगाराच्या कारवायांना वेळीच आळा घालण्यासाठी घुग्घुस, चंद्रपूर शहर व रामनगर पोलीसांनी मपोका ५६ अन्वये तडीपारीची प्रस्ताव तयार केला होता. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी सर्व पुराव्यांची कायदेशीर पडताळणी करून या सहा ही आरोपीना तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.

चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशी कडक कारवाई यापुढेही सुरू राहील बेकायदेशीर कृत्य करणाऱ्याची गय केली जाणार नाही.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर श्री. प्रमोद चौगुले, घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी श्री. प्रकाश राऊत, चंद्रपूर शहर चे ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. निशीकांत रामटेके व रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी सौ. प्रभावती एकुरके यांचे पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page