Sunday, September 27, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; कृषीपंपांच्या वीजबिलात सूट, वीजजोडणी खंडित...

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; कृषीपंपांच्या वीजबिलात सूट, वीजजोडणी खंडित न करण्यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही सूट

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; कृषीपंपांच्या वीजबिलात सूट, वीजजोडणी खंडित न करण्यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही सूट

बल्लारपूर, ब्रह्मपुरी व जिवतीच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशासाठी आ. सुधीर मुनगंटीवार २८ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला तातडीने प्रतिसाद; चंद्रपूर जिल्ह्यात निर्णय झाल्याने आ. सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांकडून आभार


*Jyotsna Wankhede*: पावसाची अनिश्चितता, पिकांची चिंताजनक स्थिती आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आग्रही मागणी अवघ्या काही तासांत निर्णयात रूपांतरित झाली आहे. खरीप २०२६ मधील Trigger-1 लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात येणार असून, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभूर्णा या १२ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या संकटाची तीव्रता वेळीच शासन-प्रशासनाच्या निदर्शनास आणून तातडीने निर्णयासाठी केलेल्या आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेबद्दल जिल्ह्यातून आभार व्यक्त होत आहेत.बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि जिवती या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. या तीन तालुक्यांनाही दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार येत्या २८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी ठोसपणे पाठपुरावा करणार आहेत.

२५ सप्टेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पिकांची स्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर आलेला वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली होती. यासंदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या अडचणी आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.शेतकऱ्यांची अडचण अधिक तीव्र होण्याची वाट न पाहता परिस्थितीचे गांभीर्य वेळीच शासनाच्या निदर्शनास आणून त्यावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी आ.मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विविध स्तरांवर ठामपणे पाठपुरावा केला होता.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयामुळे विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. कृषीपंपांच्या वीजबिलात ,विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट देण्यात येणार आहे.त्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मागणी करून थांबण्याऐवजी तिचा तातडीने पाठपुरावा करून निर्णयापर्यंत नेण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. दुष्काळग्रस्त यादीत समावेश न झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरी तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, यासाठी पुढील पाठपुरावा करण्यासाठीही आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page