*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षा प्राचार्य असमा खान मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम तसेच कार्यशाळेच्या मार्गदर्शिका म्हणून कपिला सोनुले मॅडम व मुस्कान शेख मॅडम ट्रेनर,नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वांद्रे मुंबई या मंचावर उपस्थित होत्या.
कपिला सोनुले मॅडम व मुस्कान शेख मॅडम यांनी भूकंप कसा होतो? भूकंपाचे प्रकार कोणते? आणि त्यावर उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पूर, वादळ, आग, सर्प दंश यासारख्या नैसर्गिक आपत्ती चे व्यवस्थापन कसे करायला पाहिजे याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी नैसर्गिक व मानवी आपत्तीची काळजी कशी घ्यायला पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सीमा धाडवे मॅडम यांनी केले. या कार्यशाळे करिता इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.