*ज्योत्स्ना वानखेडे*:
मध्यचांदा वनविभागाच्या अंतर्गत बल्लारशाह वनपरिक्षेत्राच्या कारवा उपक्षेत्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत कारवा-बल्लारशाह पर्यटन सफारी गेटचे उद्घाटन इको टुरिझम बोर्डाचे सदस्य माननीय श्री. प्रकाश धारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी मध्यचांदा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) श्री. आदेशकुमार शेंडगे सर, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. आर. डी. घोरुडे तथा संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनोद सिडाम उपस्थित होते. उद्घाटनानंतर आलेल्या पर्यटकांचे फूल, मिठाई आणि कारवा सफारीची कॅप देऊन स्वागत करून पर्यटनाला शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर वन्यजीव सप्ताह दि. १ ते ७ ऑक्टोबर आणि सेवा संकल्प अभियान दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर निमित्त पर्यटन सफारीच्या आतील गेट परिसराची साफसफाई करून ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘स्टडी टेबल’ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांनी ग्रामीण आणि विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताह व सेवा संकल्प अभियानांतर्गत वन, वन्यजीव आणि स्वच्छता अभियानाबद्दल मार्गदर्शन केले. वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन याबद्दल विद्यार्थी व ग्रामीणांना महत्त्व समजावून सांगण्यात आले.
याप्रसंगी कारवा-बल्लारशाह सफारीचे जिप्सी चालक व गाईड उपस्थित होते. तसेच बल्लारशाह वनपरिक्षेत्राचे सर्व अधिकारी व वन कर्मचारी आणि वनमजूर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमात कारवा गावातील पुरुष, महिला, शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमात क्षेत्र सहाय्यक कारवा – पठाण, क्षेत्र सहाय्यक बल्लारशाह – यादव, क्षेत्र सहाय्यक मानोरा – पोडचेलवार, क्षेत्र सहाय्यक कळमना – टेकाम, क्षेत्र सहाय्यक उमरी तसेच येसांबरे, देवगडे, कु. पवार, कु. काळे, चौधरी, डोडके, जाधव, हेपट, कस्तुरे, पर्वतकर, कु. तिवाडे, कु. टोंगे, बोकडे, कु. जेनेकर, कु. गेडाम, मोहुर्ले, कु. आंगलवार सर्व वनरक्षक व कंत्राटी मजूर उपस्थित होते.