Sunday, October 4, 2026
spot_img
HomeChandrapurआदिशक्तीला वंदन करणाऱ्या गीतांवर नृत्याविष्कार; १७ ऑक्टोबरला चंद्रपुरात आयोजन

आदिशक्तीला वंदन करणाऱ्या गीतांवर नृत्याविष्कार; १७ ऑक्टोबरला चंद्रपुरात आयोजन

आदिशक्तीला वंदन करणाऱ्या गीतांवर नृत्याविष्कार; १७ ऑक्टोबरला चंद्रपुरात आयोजन

नवरात्रोत्सवानिमित्त संस्कार भारतीतर्फे ‘आदिशक्ती वंदन’

 

*Jyotsna Wankhede*:

भारतीय कला, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्कार भारती, चंद्रपूर शाखेतर्फे नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त ‘आदिशक्ती वंदन’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री गजानन महाराज मंदिर, सरकार नगर, चंद्रपूर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

भारतीय संस्कृतीत आदिशक्ती ही श्रद्धा, सामर्थ्य, मांगल्य आणि सृजनाची प्रेरणा मानली जाते. नवरात्रोत्सव म्हणजे या स्त्रीशक्तीच्या विविध रूपांचे स्मरण आणि पूजन करण्याचे पवित्र पर्व. याच भावनेतून संस्कार भारतीने ‘आदिशक्ती वंदन’ या कार्यक्रमाची संकल्पना साकारली आहे.
या कार्यक्रमात आदिशक्तीला वंदन करणाऱ्या विविध भक्तिमय व भावपूर्ण गीतांवर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गीत, संगीत, नृत्य आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील शक्ती-उपासनेची समृद्ध परंपरा कलात्मक स्वरूपात रसिकांसमोर उलगडण्यात येईल.

नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात कलेच्या माध्यमातून आदिशक्तीच्या चरणी वंदन करण्याचा हा संस्कार भारतीचा विशेष प्रयत्न आहे. चंद्रपूर शहरातील नागरिक, कलाप्रेमी, नृत्य-संगीत रसिक तसेच भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून ‘आदिशक्ती वंदन’ या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्कार भारती, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page