Friday, October 9, 2026
spot_img
HomeIndiaदेशगौरव मोदीजींच्या २५ वर्षांच्या अविरत राष्ट्रसेवेला सलाम; जनकल्याणाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे...

देशगौरव मोदीजींच्या २५ वर्षांच्या अविरत राष्ट्रसेवेला सलाम; जनकल्याणाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

देशगौरव मोदीजींच्या २५ वर्षांच्या अविरत राष्ट्रसेवेला सलाम; जनकल्याणाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

‘गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान में’ या सेवामंत्राची पुन्हा उजळणी; विकसित भारताच्या उभारणीत प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान देण्याचा निर्धार

*Jyotsna Wankhede*: ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सुरू झालेली देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची २५ वर्षांची अविरत राष्ट्रसेवा ही केवळ सत्तेच्या प्रवासाची कहाणी नाही, तर सामान्य माणसाच्या स्वप्नांना विकासाची दिशा देणाऱ्या एका युगप्रवर्तक नेतृत्वाची गौरवगाथा आहे, अशा शब्दांत देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवापर्वाला अभिवादन करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी, “मोदीजींच्या राष्ट्रसेवेपासून प्रेरणा घेत भाजपा कार्यकर्त्यांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन केले. विकसित भारत संकल्प सभेनिमित्त दुर्गापूर, मूल आणि पोंभूर्णा येथील नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांना आ. मुनगंटीवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

आ. मुनगंटीवार म्हणाले की, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील २५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे भारताच्या परिवर्तनाचा प्रवास आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा हा प्रवास विकास, सुशासन, जनकल्याण आणि राष्ट्रहित यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वाची साक्ष देतो. सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडविणे, गरीबाला सन्मानाने जगण्याची संधी देणे आणि देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे, हे मोदीजींच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या अविरत राष्ट्रसेवेला आपण सर्वांनी कृतज्ञतापूर्वक सलाम केला पाहिजे. मोदीजींच्या २५ वर्षांच्या सेवापर्वाचा गौरव हा केवळ अभिनंदनाचा क्षण नाही, तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाजसेवेची नवी जबाबदारी स्वीकारण्याचा क्षण आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेचा उल्लेख करत आ. मुनगंटीवार म्हणाले की, ज्यांच्यासाठी बँकेचे दारही कधी सहज उघडत नव्हते, त्या गरीबांच्या हातात बँक खाते देण्यापासून ते त्यांच्या घरात गॅस, डोक्यावर पक्के छप्पर आणि शेतकऱ्याच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचविण्यापर्यंत मोदी सरकारने जनकल्याणाचा अर्थच व्यापक केला आहे.

भाजपाचा कार्यकर्ता हा केवळ राजकारण करणारा कार्यकर्ता नाही; तो समाजाच्या वेदनेला आपली वेदना मानणारा आणि गरजूच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणारा सेवाव्रती कार्यकर्ता आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.आपल्या राजकीय प्रवासातील सेवाभावाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, २ एप्रिल २०१० रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण ‘गरीबों के सम्मान में भाजपा मैदान में’ हा नारा दिला होता. हा नारा आजही भाजपा कार्यकर्त्यांच्या सेवाकार्याचा आधार आहे. रंजले-गांजले, दीन-दुर्बल, शोषित-वंचित, दिव्यांग, निराधार, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि मुली यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील पात्र नागरिकांची माहिती घेऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. ‘हर घर मोदी, घर घर मोदी’ हा केवळ घोष न राहता ‘हर घर विकास, घर घर कल्याण’ या भावनेतून काम करण्याची गरज असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, विकसित भारताचा संकल्प हा केवळ शासनाचा संकल्प नाही, तर देशातील प्रत्येक गावाच्या प्रगतीत, प्रत्येक घराच्या समृद्धीत आणि प्रत्येक नागरिकाच्या सन्मानपूर्ण जीवनात त्याचे खरे प्रतिबिंब उमटले पाहिजे. देशाच्या विकासाची ही गंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली, तरच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी शासन आणि जनता यांच्यातील विश्वासाचा सशक्त दुवा बनून प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत जनकल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सेवाभावाने पुढाकार घ्यावा. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शासनाच्या नेतृत्वातील २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. भारताला सामर्थ्यवान, आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा माननीय मोदीजींचा संकल्प अधिक बळकट होवो, त्यांचे राष्ट्रसेवेचे कार्य अखंड सुरू राहो आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होवो,अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page