Saturday, October 10, 2026
spot_img
HomePolice*वाहतुक पोलीसांचे आवाहन;चुकीच्या दिशेने प्रवेश केल्यास वाहनांचे होणार नुकसान*

*वाहतुक पोलीसांचे आवाहन;चुकीच्या दिशेने प्रवेश केल्यास वाहनांचे होणार नुकसान*

*वाहतुक पोलीसांचे आवाहन;चुकीच्या दिशेने प्रवेश केल्यास वाहनांचे होणार नुकसान*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर हद्दीतील जटपुरा गेट परीसरात होणारी वाहतुक कोंडी आणि चुकीच्या दिशेने (WRONG Side) वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनातर्फे राँग साइड कटर (Spike Barrier) बसविण्यात आलेले आहेत.
अनेकदा वाहनचालक घाईत किंवा शॉर्टकट मारण्याच्या नादात विरुद्ध दिशेने गाडी चालवतात, ज्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यावर आळा घालण्यासाठी आणि वाहतुक शिस्तबध्द करण्यासाठी हे कटर कार्यान्वित करण्यात आले
*वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या सुचना :-*
१) चुकीच्या दिशेने गाडी चालवु नये :- कटर बसवलेल्या भागातुन विरूद्ध दिशेने वाहन नेल्यास कटरमधील स्पाईक्समुळे वाहनाचे टायर्स लगेच पंक्चर किंवा फाटुन मोठे नुकसान होईल.
२) वाहतुकीच्या योग्य दिशेने जाणा-या वाहनांना या कटरचा कोणताही त्रास होणार नाही.
३) नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कटरद्वारे होणाऱ्या नुकसानासोबतच वाहतुक नियमांनुसार कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुक शिस्त पाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे हा स्वतःचा आणि इतरांचा जिव धोक्यात घालणारा प्रकार आहे. नागरिकांनी वाहतुक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि दंडात्मक कारवाई किंवा वाहनाचे नुकसान टाळावे.
प्रशासनाकडून सर्व वाहनचालकांना नम्र आवाहन करण्यात येते की, त्यांनी रस्त्यावरील दिशादर्शक फलक पाहुनच योग्य दिशेने वाहन चालवावे आणि वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page