Saturday, October 10, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉनचा शुभारंभ

चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉनचा शुभारंभ

चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉनचा शुभारंभ
११ ऑक्टोबरला लोगो अनावरणासह ३ किलोमीटर जनजागृती मॅरेथॉन
राष्ट्रीय स्तरावरील ‘चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉन’ ३ जानेवारी २०२७ रोजी

*Jyotsna Wankhede*: चंद्रपूरच्या क्रीडा, पर्यटन, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने स्पोर्ट्स सोसायटी ऑफ चंद्रपूर यांच्या वतीने आणि लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेड यांच्या  प्रमुख प्रायोजकत्वातून  तसेच चंद्रपूर पोलिस, कैलिबर, बैंक ऑफ महाराष्ट्र   यांच्या सहकार्याने  *‘चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉन’* चे आयोजन करण्यात येणार आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन ३ जानेवारी २०२७ रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.या महत्त्वाकांक्षी मॅरेथॉनच्या आयोजनाची अधिकृत घोषणा तसेच मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस हेडक्वार्टर्स मैदान, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष उद्घाटनीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

या निमित्ताने नागरिकांमध्ये आरोग्य, व्यायाम, धावण्याची संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या पर्यटनाची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी ३ किलोमीटर जनजागृती मॅरेथॉनचेही आयोजन करण्यात आले आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या उद्घाटनीय कार्यक्रमास जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त अकनूरी रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुज रेड्डी, तसेच लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेडचे जी. एस. व्ही. प्रसाद आणि प्रशांत पुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चंद्रपूरच्या नावाला राष्ट्रीय क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्याबरोबरच

Say no to drugs *Run for Health – Run for Nature – Run for Tadoba’

या व्यापक संकल्पनेतून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये नियमित व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

चंद्रपूरच्या ओळखीला राष्ट्रीय व्यासपीठ

ताडोबाची समृद्ध वनसंपदा, वाघांचे अधिवास, जैवविविधता आणि चंद्रपूरची सांस्कृतिक व औद्योगिक ओळख यांचा सुंदर संगम या मॅरेथॉनच्या माध्यमातून देशभरातील धावपटूंसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या विविध भागांतून धावपटू चंद्रपूरमध्ये येऊन सहभागी व्हावेत आणि चंद्रपूर-ताडोबाची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या मॅरेथॉनच्या माध्यमातून क्रीडा पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि पर्यावरण पर्यटनाला चालना देण्याबरोबरच चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक युवक, स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटना आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

आयोजनासाठी समितीचे अथक प्रयत्न

या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्पोर्ट्स सोसायटी ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. प्रजक्ता असवार, कोषाध्यक्ष अनिल टहिल्यानी, उपाध्यक्ष डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मनीषा वासाडे, सहसचिव  अमित मुत्यालवार, डॉ. रिजवान शिवजी, मकरंद खाडे आणि मोहम्मद काचवाला यांच्यासह संपूर्ण आयोजन समिती अथक परिश्रम घेत आहे.

३ जानेवारी २०२७ रोजी होणारी ‘चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉन’ ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून चंद्रपूरच्या आरोग्य, क्रीडा, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय व्यासपीठावर नेणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page