Thursday, October 22, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न*

*धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न*

*धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न*

*Jyotsna Wankhede*: भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुरच्या वतीने मंगलवार दिनांक 20/10/2026 ला भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार, विद्यानगर बल्लारपुर येथे ” *धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त” *धम्मप्रबोधन* कार्यक्रम संपन्न झाला.भैय्यालाल मेश्राम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.डाॅ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण विजय कांबळे यांनी केले.

याप्रसंगी धम्ममित्र धम्ममित्र भास्कर भगत यांनी *धम्मचक्रातिल 24 आ-यावर* सविस्तर  मार्गदर्शन केले. त्यानी सांगीतले की 12 कड्या या भवचक्राशी संबंधित आहेत तर उर्वरित 12 कड्या या उर्ध्वगामी चक्राकार मार्गाशी संबंधित आहेत. धम्मचक्र हे अंधारातुन प्रकाशाकडे, दुःखमुक्तिकड़े नेणारे आहे. सुरुवातीस त्रिशरण पंचशील विधायक पंचशील  त्रिरत्न वंदना घेण्यात आली. सोनु खोब्रागडे हिने बाविस प्रतीज्ञा वधवुन घेतल्या.

परमानंद भडके,बुध्द पोर्णीमा समारोह समीतीचे अध्यक्ष अतुल शेंडे,रितेश बोरकर,प्रितम उमरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले. धम्मपालन गाथेने कार्यक्रम संपन्न झाला. बुद्ध जयंती उत्सव समितिच्या वतिने यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page