Thursday, June 4, 2026
Homeबल्लारपूर*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन ...
spot_img

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न*

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन  कार्यक्रम संपन्न*

ज्योत्सना वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा  स्मृतिदिन  कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी भगत, प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोला माल्यार्पण   करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, यू. के. रांगणकर  यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत माहिती विषद करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना
” लोहपुरुष ” कसे म्हणतात, हे पटवून दिले. तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे कसे योगदान आहे. याप्रमाणे माहिती विषद करून आदरांजली वाहिली.
दिनांक: 15/ 12/ 2023 रोजी शाळेचे शिक्षक राजू  वानखेडे यांचा वाढदिवस असल्याकारणाने, त्यांच्याकडून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि शाळेच्या  ग्रंथालयाला पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आलीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर वामनभाऊ बोबडे, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे व इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page