Thursday, July 30, 2026
spot_img
HomeSpardhaबल्लारपूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा चिखलात

बल्लारपूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा चिखलात

बल्लारपूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा चिखलात

श्रेयश वानखेडे :-
बल्लारपूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा चिखलात घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
      आज १० सप्टेंबर रोजी बल्लारपूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन तालुका स्टेडियम विसापुर येथे आयोजित करण्यात आले आहे. काल पासून येणाऱ्या पावसामुळे येथील मैदानात चिखल झाले असून काही जागी पाणी साचले आहे. आज तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात चिखलात कबड्डी स्पर्धा घेतले आहे. जिल्हास्तरीय कबड्डी मॅट वर होत असताना जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय स्तरावर च्या स्टेडियम मध्ये चिखलात कबड्डी घेणे किती योग्य आहे. इतक्या मोठ्या स्टेडियम मध्ये मॅट उपलब्ध नसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर एखाद्या कबड्डी पटू त्या चिखलात घसरून पडून ईजा झाली असता त्याचे जबाबदार कोणाला धरले असते. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शारिरीक शिक्षक या तालुका स्तरीय आयोजन समिती ला. चिखलात कबड्डी स्पर्धा घेण्याचा बद्दली एकद्या शहरातील कबड्डी मैदानात घेतले असते तर सयोंजकाची कमीपणा दिसणार होती का? एका शारिरीक शिक्षकाने सांगितले की कबड्डी स्पर्धा अगोदर १ सप्टेंबर ला घेणार होते. नंतर ती स्पर्धा रद्द करून २ सप्टेंबर ला घेणार होते. आणखी तीच स्पर्धा रद्द करून १० सप्टेंबर ला घेतली गेली.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page