Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeJayantiजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Shreyash Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक ), सोनल गेडाम, मीना गेडाम तसेच प्रमुख उपस्थिती  आर. बी. अलाम,  यु. के. रांगणकर सर यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थिनी  शिक्षा रामटेके,  त्रिष्णा शिडाम, अभिषा टेंबरे, त्रिशाली महानंद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले भाषण सादर केले तसेच अनुष्का दुर्गे व  शिक्षा रामटेके यांनी गीत सादर केले.
याप्रसंगी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच गेडाम परिवारातर्फे पूजा गेडाम स्मृती पित्यर्थ सर्वच विद्यार्थ्यांना  पिण्याच्या पाण्याची बॉटल चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सोनल गेडाम, यु. के. रांगणकर सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान. एकनाथराव शिंदे यांनी केलेले आव्हान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे  मॅडम तसेच आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
 कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  गणेश चंदावार (बाबू), जगदीश कांबळे, वामनराव बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आणि विद्यार्थीगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page