Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeEducationशिक्षक विद्यार्थ्यांचे शोषण करणारे संस्थाचालक राष्ट्रद्रोहीच--- विवेक आंबेकर

शिक्षक विद्यार्थ्यांचे शोषण करणारे संस्थाचालक राष्ट्रद्रोहीच— विवेक आंबेकर

शिक्षक विद्यार्थ्यांचे शोषण करणारे संस्थाचालक राष्ट्रद्रोहीच— विवेक आंबेकर

आपल्या शिक्षण संस्थेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे शोषण करणारे शिक्षण संस्था चालक व त्यांना साथ देणारे शासनाच्या शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी हे राष्ट्रद्रोहीच आहे असे प्रतिपादन विवेक आंबेकर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अधिवेशनाप्रसंगी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील शैक्षणिक विभागात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला  असून त्याचा दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रात होत आहे.

विशेष करून राज्यातील प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल येथे शिक्षक व विद्यार्थ्यांचे शोषण शिक्षण संस्था चालक फार मोठ्या प्रमाणात करीत असून ते शैक्षणिक कायद्याचे सर्व उल्लंघन करीत आहे. याला शिक्षण विभागातील अधिकारी जबाबदार असून त्यांच्या आ आशीर्वादानेच  शैक्षणिक कायदा व राज्यघटनेचा अनादर करण्याचे धाडस हे शिक्षण शिक्षण संस्था चालक करीत असून विद्यार्थी व शिक्षकांचे शोषण करीत आहे.

कॉन्व्हेंट शाळेत  शिक्षकांना एम ई पी एस 1981 नुसार पूर्ण वेतन देण्याची व त्यांना लागू असलेल्या सर्व अटी शर्ती ची पूर्तता संस्थाचालकाने करावी असे निर्देश असताना अनेक कॉन्व्हेंट शाळेचे शिक्षण संस्थाचालक शिक्षकांना तुटपुंजे वेतन देऊन व त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांचे शोषण करीत आहे. या कॉन्व्हेंट शाळांमध्ये 95 टक्के महिला कर्मचारी काम करीत असून त्यांना संस्थाचालकांच्या दडपणाखाली काम करावे लागत असून, त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही होत आहे, येथील शिक्षक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा, पी एफ, ग्रॅच्युईटी व सेवा पुस्तिकेचे एक प्रत नियमानुसार लागू करणे  संस्थाचालकांना बंधनकारक असूनही त्या लागू केल्या जात नसून त्यांच्यावर कोणत्याही संघटनेचे सदस्य होणे किंवा त्यांना अन्याय  विरोधात आंदोलन करण्यास मनाई असून त्यांच्याकडून तसे लिखित स्वरूपात लिहून घेतले जात आहे.

हे अत्यंत दुर्दैव असून व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. असे घटने विरोधी शिक्षण संस्थाचालक खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आहे व त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे याप्रसंगी विवेक आंबेकर यांनी म्हटले.

कार्यक्रमाला राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी शिक्षक आमदार नागोजी गाणार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी व फार मोठ्या संख्येत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page