*मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे स्काउट्स आणि गाईड्स उद्बोधन वर्ग*
*ज्योत्स्ना वानखेडे*
मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे स्काउट्स आणि गाईड्स उद्बोधन वर्ग घेण्यात आले. या उद्बोधन वर्गा चे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आसमा खान मॅडम तसेच मा. दीपा मडावी मॅडम, मा. उईके सर, मा.जाधव सर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर) चंद्रकांत भगत सर सर्व मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व सर्व उपस्थित्यांनी लॉर्ड बेडन पॉवेल आणि सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उद्बोधन वर्गामध्ये स्काऊट गाईडच्या उपक्रमाबद्दल माहिती सांगण्यात आली. त्यामध्ये अभ्यासक्रम, जिल्हा मेळावा, राज्य पुरस्कार,राष्ट्रपती पुरस्कार,पंतप्रधान ढाल खरी, कमाई, वर्षा सहल, राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत सामुदायिक विकास प्रकल्प, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, बेटी बचाव, बेटी पढाव,प्लास्टिक निर्मूलन, सर्फ स्मार्ट इत्यादी कार्यक्रमाचे वर्षभरासाठी नियोजन करण्याबद्दल माहिती सांगण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती या तालुक्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक सहभागी होते. अशाप्रकारे उदबोधन वर्गाची सांगता वंदे मातरम् या गीताने झाली.