बल्लारपुर रेल्वे पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा , अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन छेडू -चेतन गेडाम यांचा इशारा

श्रेयश वानखेडे:
रेल्वे विभागाद्वारे बल्लारपूर येथील गोल पुलिया रेल्वे लाईन दुरुस्तीसाठी दि. १६/१/२०२४ ते२६/१/२०२४ पर्यंत गोल पुलीया हा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. ती मर्यादा संपली असून विभागांद्वारे रेल्वे दुरुस्तीचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे.सदरहु कामामुळे बल्लारपूर शहरवासीयांना, वस्ती विभागात शाळा शिकणाऱ्या शाळाकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्मशान भूमी कडे जाणाऱ्या अंतिम यात्रेला व ग्रामीण रुग्णालय बल्लारपूरला जाण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व नागरिकांचा विचार लक्षात घेता दुरुस्तीचे काम हे लवकरात लवकर पूर्ण करून २९/१/२०२४ रोजी सुरू करण्यात यावे. सदरहु काम हे लवकर पूर्ण न झाल्यास रेल्वे विभागा विरोधात दि.१/२/२०२४ पासून रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल. व या आंदोलनास सर्वस्व रेल्वे विभाग जबाबदार राहील.
असे कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम म्हणाले.
यावेळी जिल्हा महासचिव शंकर महाकाली, युवक कांग्रेस बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष अरबाज सिद्दीकी, संजीव सुददाला, जीशान सिद्दीकी, रोशन ढेगळे, सोनू आमटे, राजा केशकर, रवि जैसवाल व युवक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.