Thursday, June 4, 2026
HomeParbhaniसेलू येथे खेलो इंडिया युथ गेम्स बिहार मधील विजेता खेळाडू वैभव रोडगे,...
spot_img

सेलू येथे खेलो इंडिया युथ गेम्स बिहार मधील विजेता खेळाडू वैभव रोडगे, गौरी शिंदे व प्रशिक्षक संजय मुंढे जल्लोषात स्वागत.

सेलू येथे खेलो इंडिया युथ गेम्स बिहार मधील विजेता खेळाडू वैभव रोडगे, गौरी शिंदे व प्रशिक्षक संजय मुंढे जल्लोषात स्वागत.

श्रेयश वानखेडे:
दि. 13 मे रोजी 7 वी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रग्बी संघास सेलू च्या वैभव जगन्नाथ रोडगे यांनी कांस्यपदक विजेता तर महाराष्ट्र राज्य मुले खो-खो संघाचे प्रशिक्षक संजय मुंढे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य रग्बी संघास सहभागी कु. गौरी शिंदे यांच्या रायगड कॉर्नर सेलू जल्लोषात स्वागत करण्यात आले.महाराष्ट्र राज्य रग्बी मुले संघाने कांस्यपदक च्या लढतीत दिल्ली संघाचा पराभव करत महाराष्ट्र संघास वैभव रोडगे यांनी कांस्यपदक पटकावले.याप्रसंगी मा. पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवार, योगासन जिल्हा सचिव डी.डी. सोन्नेकर, प्रा. नागेश कान्हेकर, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक , सुभाष मोहेकर, भगवान जाधव, विजय पांडे, सुरेश रोडगे, सचिन रोडगे व राज्य राष्ट्रीय खेळाडू यांनी स्वागत करुन अभिनंदन केले.वैभव जगन्नाथ रोडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  नूतन विद्यालय सेलू येथे कबड्डी खेळांचा सातत्याने सराव करताना, मी शालेय जिल्हा रग्बी क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळांचे आवड निर्माण झाली. माझा रग्बी या खेळाचा प्रवास शालेय स्तरावर  सुरू झाला माझी रग्बी खेळाची पहिली स्पर्धा जिल्हा स्तरीय होती. तेथून आमची रग्बी खेळाला सुरुवात झाली. मग आमचा रग्बी खेळाची संघ तयार झाला मग आम्ही अनेक राष्ट्रीय स्पर्धा सहभाग नोंदवला. आम्हा ला प्रशिक्षणासाठी या सिनियर खेळाडूंनी खूप मदत केली विजय पांढरे  काशीफ शेख वैभव खुणे रग्बी खेळ खेळत असताना मला माझ्या आई-वडिलांचा व संपूर्ण घरच्यांचा पाठिंबा होता च पण तसेच माझ्या शाळेतील म्हणजेच नूतन विद्यालयातील प्रशांत नाईक सर, गणेश माळवे सर, डीडी सोनेकर सर नागेश कान्हेकर सर, योगेश आदमे सर व जिल्हा संघटनेचे सचिव शिवाजी खुणे सर या सर्वांचाही मार्गदर्शन लाभला आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मला 7वी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार येथे महाराष्ट्र रब्बी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि मी त्या संधीचे सोने केले व महाराष्ट्र संघाला कास्यपदक मिळवून दिले त्यामुळे मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो… सेलू शहरातील खेळाडूंनी रग्बी खेळातून आपलं करिअर घडवावे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page