Sunday, January 18, 2026
HomeEducationमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

श्रेयश वानखेडे:

दिनांक 27/02/2024 मंगळवार ला महात्मा ज्योतिबा फुले हिंदी उर्दू तेलुगू विद्यालय बल्लारपूर येथे वर्ग दहावीच्या (तेलुगू माध्यम)विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  मकसूद सर,संस्था सचिव ताजने सर, माजी पर्यवेक्षक  डी लक्ष्मण राव सर, पाळी प्रमुख हेमलता मॅडम, ज्येष्ठ शिक्षक  रवी अनसूरी सर ,  पेन्दोर सर , वैरागडे सर, पत्रकार तथा माजी विद्यार्थी  शांतिकुमार गिर्मिल्ला, प्रशांत गज्जाला,  रघुनाथ झोडे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. वरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यानी  तसेच शाळेतील शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कु. रक्षिता अद्दूरी, प्रास्ताविक कु. श्रुती कासा आणि आभार प्रदर्शन रुद्रमहेश या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम दरम्यान सर्व अतिथिंना विद्यार्थ्यानी भेटवस्तू आठवण म्हणून दिल्या, कार्यक्रमात गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत गाण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page