Friday, July 3, 2026
HomeEducationतब्बल 23 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा
spot_img

तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

ज्योत्स्ना वानखेडे:

सरस्वती विद्यालय मुधोली ता .भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे सन 2001 ते 2003 वर्ग 8 ते 10 वी च्या माजी विद्यार्थी यांनी दिनांक 10 मे 2026 ला “मित्रोत्सव ” माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 प्रथमतः स्वागत गीताने सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत करून त्यानंतर पुष्पगुच्छ व एक अस्मरणीय भेट  सर्व शिक्षकांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गणित शिक्षक श्री खोंड सर यांना वर्ग घेण्यास बाध्य केले व गणिता वर्ग सुद्धा घेण्यात आला. यात सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन झाले.

सोबतच कुमारी सविता नरुकर यांनी एक सुंदर असे स्वरचित गित सादर केले. विद्यार्थ्यांनी  सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. शाळेप्रती असणारी आस्था, प्रेम, जिव्हाळा याची जाणीव ठेवून शाळेतील रंगरंगोटी करिता  भरभरून मदत सुद्धा केली.

 खेळ, नृत्य,शाळा असा संपूर्ण दिवस मित्राच्या सहवासात गेला प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या व आजचा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील अश्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. सुख दुःख सर्वांसोबत शेअर करावे असे सांगण्यात आले.

शिक्षकानी भर भरून आशीर्वाद दिला.

ज्या शाळेत आम्ही घडलो त्या शाळेला  फुल नाही फुलाची पाकळी या रूपाने आम्ही मदत करू असे सर्व मुलांनी मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री डोंगरे सर होते तर प्रमुखअतिथी म्हणून सरस्वती विद्यालय मुधोली चे मुख्याध्यापक श्री खोंड सर,सरस्वती विद्यालय सालोरी चें मुख्याध्यापक श्री धारने सर, श्री .झाडे सर, श्री श्रीरामे सर, श्री.सावसाकडे सर, श्री शेख सर,श्री राणे सर,श्री गेडाम सर,रामटेके मॅडम, गुलाब भाऊ घरत,कुंदन जनबंधू,बावणे साहेब ,अरुण सावसाकडे हे होते .

पुन्हा एकदा पूर्वीसारखाच आपल्या वर्गात बसून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकेश टेंभुर्णे यांनी, आभारप्रदर्शन संजय बावणे तर सूत्र संचालन अमोल जिवतोडे, व सुनीता जिवने यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव चौखे, कलाम शेख, शंकर राणे, शंकर घरत,विकास जिवतोडे,नरेश श्रीरामे,शांताराम ननावरे,अमरदीप जांभुळे,गजू केदार,मंगेश मानकर,अंकुश आत्राम,शोभा मेश्राम, मंजुषा ताजने, सविता नरुकर,मंगला झाडे व इतर मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page