Tuesday, January 20, 2026
Homeबल्लारपूरबालाजी महिला ग्रुप द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न
spot_img

बालाजी महिला ग्रुप द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न

बालाजी महिला ग्रुप द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न

श्रेयश वानखेडे:
स्थानिक बालाजी वार्डामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी महिलांच्या उन्नतीचा मार्ग हा शैक्षणिक प्रगतीतूनच जातो असे  प्रतिपादन केले आणि महिलांना जर पुरुषांच्या बरोबरीने उभे राहायचे असेल तर केवळ छोट्या-मोठ्या गोष्टी मधली उन्नती नाही तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये पुरुष प्रगती करत आहे. त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात किंबहुना 50 टक्के वाटा हा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा असला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
केवळ चूल आणि मूल सांभाळणे आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे ही फक्त महिलांची जबाबदारी राहू शकत नाही तर पुरुषांनी आणि महिलांनी सारख्याच जबाबदारीने कुटुंब सांभाळावे आणि महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने  जगातल्या सर्व क्षेत्रांमध्ये  पन्नास टक्के सहभाग मिळाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला हेमा चिंतावार, अंजली खत्री, प्रांजली राजुरकर, मीनल बाटवे, सुनंदा गंदेवार, सुनंदा बोनगीरवार,  झाडे काकू, माहुरकर काकू, वंदना पोतराजे, सुजाता पनके, सीमा धाडवे, संध्या दरेकर, जया दरेकर, अंबाला ताई, फसाला आंटी, माधुरी पाल, नक्षीनेताई, वासनीक ताई, कविता खरतड, भावना खरतड, मीनाताई चौधरी, गीता दुधलकर, श्रवंती दारी, सखुबाई दरेकर इत्यादी महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या सूत्रसंचालन चांदणी रोहनकर यांनी तर आभार प्रदर्शन भावना वर्दीलवार यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page