Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeChandrapurभारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे महाराणी दुर्गावती पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण

भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे महाराणी दुर्गावती पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण

भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे महाराणी दुर्गावती पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण

*Jyotsna Wankhede*:

गोंडवाना साम्राज्याच्या शूर, पराक्रमी व स्वाभिमानी वीरांगना महाराणी दुर्गावती यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक येथे अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महाराणी दुर्गावती यांचे शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्त्रीशक्ती, धैर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या महाराणी दुर्गावती यांच्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेविका सरला कुळसंगे, बीएलए-1 प्रमुख सुमित बेले, सरिता घटे, माला पेंदाम, वैशाली मेश्राम, सविता ब्राह्मणे, रंजीता येले तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page