Wednesday, January 14, 2026
HomeEducationमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा महिला संमेलन कार्यक्रम संपन्न
spot_img

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा महिला संमेलन कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा महिला संमेलन कार्यक्रम संपन्न

श्रेयश वानखेडे:
दि. ३१ मार्च २०२४ ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा महिला संमेलनाचा कार्यक्रम राणी राजकुंवर प्राथ. शाळा, चंद्रपूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार नागो गाणार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी यांनी सभेला आभासी प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. मान्यवराचे स्वागत गिताने व पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. परिषद गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सभेच्या उद्घाटक सौ. मुग्धाताई पाठक, अध्यक्षा स्नेहल बांगडे, वक्ता-डॅा. माधवी भट व रत्नाताई चौधरी वर्धा या होत्या. महीलादिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या वैशाली अंड्रसकर, कल्याणी भट्टी, स्नेहल राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अजय वानखेडे अध्यक्ष नागपूर विभाग, विनोद पांढरे उपाध्यक्ष नागपूर विभाग, विलास खोंड,अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर,विवेक आंबेकर कान्व्हेट विभाग प्रमुख शुभांगी चिकटे महिला आघाडी प्रमुख वर्धा यांनी मार्गदर्शन केले. दिलीप मॅकलवार, वसंत वडस्कर, रविंद्र कंचर्लावार, , विकास नंदुरकर, संतोष सोनवने,प्रदिप रत्नावार, करूणा ठाकूर, रोहिणी वरभे, शिखा मंडल, सारिका राचर्लावार, वैशाली दुर्योधन, रसिका पोटे, उमा पवार व मोठया संख्येने महीला इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजिका सरिताताई सोनकुसरे यांनी केले. संचलन  रागिनी नंदुरकर यांनी केले. सत्कार मूर्ती महिलांचा परिचय रोहिणी वरभे यांनी केले. आभार प्रदर्शन रजनी पोडे यांनी मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page