मागण्यांसोबत सामाजिक कामात लक्ष केंद्रित करा, विकसित भारताचे स्वप्न शिक्षणाशिवाय अपुर्ण आहे ! -प्रमोद काळबांडे, संपादक दैनिक सकाळ
ज्योत्स्ना वानखेडे:
खाजगी शाळा शिक्षक संघाचे, रविवार दिनांक २२ मार्च ला विभागीय अधिवेशन अध्यापक भवन, गणेश पेठ,बस स्थानकांसमोर योजित करण्यात आले, उद्घाटक प्रमोद काळबांडे, संपादक दैनिक सकाळ, यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षकांच्या मागण्या सोबत सामाजिक कामात लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून, अनेक भटक्या जमाती नागपूर आसपास झोपड्यात राहतात अशी संख्या वीस कोटी आहे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले, विकसित राष्ट्रांची भुमिका शिक्षकांशिवाय पुर्ण होणार नाही हे खरे आहे.
आ विकास ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांनी पेंशन हा कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिल्यास यावर तोडगा निघू शकतो, याबाबत खाजगी शाळा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित करतो असे स्पष्ट व्यक्त केले.
कर्मचारी महासंघाचे नेते अशोक दगडे यांनी नवीन पेन्शन स्कीम पर्याय निवडी बाबत ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत आहे NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली, RNPS सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व UPS एकीकृत निवृत्तीवेतन योजना या पैकी एकाची निवड करावी लागेल ही करतांना आपला आपल्या कुटूंबाचा व आपल्या पुढील आकांशा याचा विचार करूनच विकल्प द्यावा यावर मार्गदर्शन केले, कर्मचारी महासंघाने दिनांक २१ एप्रिल पासून राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.
टी.ई.टी.संदर्भातील मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्रातील दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळेतील शिक्षकांना लागू करण्यात होणार नसल्याचे दाखल्यासह संघाचे उपाध्यक्ष तेजराम बांगडकर यांनी व्यक्त केले.
संघटनेचे उपाध्यक्ष लोकपाल चापले यांनी अनुकंपा नियुक्ती खाजगी शाळा शिक्षक संघाने वरोरा, नागपूर, कामठी, वर्धा,मुल व गडचिरोली याठिकाणी अनुकंपा धारक कुटुंबातील शिक्षक विधवा यांचेसोबत दिलेल्या लढ्याची माहिती दिली, काही शिक्षक प्रतिनिधी यांनी अनुकंपा धारकांना मदत न करता, संस्थेच्या गैरप्रकारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला यावर दु:ख व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद रेवतकर होते.सौ.स्नेहल ज्ञानेश्वर ठाकरे, नगरसेविका, किरण चीनकुरे,उपशिक्षणाधिकारी, सौ.दिपाली डबली, अध्यक्ष सीसवा,तेजराज राजुरकर, राजेश हाडके उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वश्री पवन नेटे,मोरेश्वर मौदेकर, लतेश कोरडे, विजय आगरकर, पुरूषोत्तम टोंगे,ज्ञानेश्वर नागमोते,महेश गीरी,हर्ष बांते,अतुल भुरे, ज्ञानेश्वर घंगारे,अरूण मोखारे,प्रमोद कुंभारे,प्रांजल देशमुख, विद्या मोरे, वेदिका डोंगरावर, पुरूषोत्तम कामडी, निलेश बायो, प्रेमलाल मलेवार यांचा यशस्वी होण्यासाठी सहभाग होता.