चिंतामणी माध्यमिक विद्यालयात केली २२ वर्षे सेवा
चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाचे आयोजन

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर येथील चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथील सहायक शिक्षक विनायक काळे यांनी चिंतामणी परिवारात २२ वर्षे सेवा दिली. मार्च महिन्यात ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. विसापूर येथिल विनायक काळे यांचा सेवानिवृतीबद्दल ह्रदयस्पर्शी सत्कार समारंभ वसंत वैभव सभागृहात रविवारी पार पडला.
बल्लारपूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसापूरच्या चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार होते,तर विशेष अतिथी म्हणून चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील दोंतुलवार, सत्कारमुर्ति विनायक काळे,त्यांच्या पत्नी उमा काळे,माजी जि. प.सदस्य रामभाऊ टोंगे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,माजी सरपंच बंडू गिरडकर, सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे,चिंतामणी परिवारातील एम.टी. नक्षीने,एन.एच.पठाण,आर. जी.वेगीनवार,सुरेंद्र काळबांडे यांची उपस्थिती होती.
दरम्यान चिंतामणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त शिक्षक विनायक काळे व त्यांच्या पत्नी उमा काळे यांचा पुष्पगुछ ,शाल,श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करून ह्रदयस्पर्शी सत्कार केला. यावेळी मान्यवरांनी विनायक काळे यांच्या सेवा काळातील आठवणींना मनोगतातून उजाळा दिला.यावेळी अनेकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनोकामना व्यक्त केली. प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक अरुण टोंगे यांनी केले.संचालन चंद्रकांत पावडे यांनी तर आभार शुभांगी बरडे यांनी मानले. यावेळी विणा चांदेकर,ललिता पोडे ( टोंगे ),संगीता उमरे,विजय सातपुते,मुन्नालाल पुंडे, विकास कल्लूरवार,संतोषी तागलापल्लीवार, कृषागौतमी खोब्रागडे,श्रद्धा साखरकर,रवींद्र कोडापे,विलास देठे,सुभाष भटवलकर यांची उपस्तिथी होती.