जेव्हा एखाद्या राजकीय पक्ष किंवा उमेदवार आगामी निवडणूकीत मतदारांना प्रलोभन देऊन पैसे देतो व मतदार आपले अमूल्य मत विकण्याचा विचार करतो तर हे चुकीचे आहे, कारन मतदान करणे म्हणजे लोकशाहीला बळकट करणे होय.
ज्या उमेदवारांनी सामान्य जनतेसाठी शिक्षण,आरोग्य, रोजगार,रस्ते व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या व आपले प्रश्न मागील लावतात त्यांनाच मत केले पाहिजे.
जर आपण आपले मत पैसेसाठी अयोग्य उमेदवारांना निवडून आणले तर सर्व सुविधा पासून वंचित राहू!आपल्यासाठी व येणाऱ्या पिढीसाठी ते खूप वाईट आहे व सुविधा होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर होतात. म्हणूनच जो करेल काम त्यांनाच मत असे धोरण राखून लोकशाही बळकट करावी. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त मतदान करावे , मतदान करने हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी सांगितले.