Sunday, September 6, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपुरात भीषण पाणी टंचाई, 80 वर्षीय इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू, दोषींवर गुन्हे...

बल्लारपुरात भीषण पाणी टंचाई, 80 वर्षीय इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू, दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची राजू झोडे यांची मागणी

बल्लारपुरात भीषण पाणी टंचाई, 80 वर्षीय इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू, दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची राजू झोडे यांची मागणी

श्रेयश वानखेडे:

बल्लारपुर शहरातील अनेक वार्डात 26 एप्रिल पासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून याकडे बल्लारपुर नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण यांच्यामुळे संतोषी माता वार्डात राहणाऱ्या देवचंद फतूजी ढोरे वय 80 (कालच वाढदिवस & मृत्यु एकाच दिवसी ) रा. संतोषी माता वार्ड बल्लारपुर नामक इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बल्लारपुर नगरपरिषदचे मुख्याधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

मागील पाच ते सहा दिवसांपासून बल्लारपुर शहरातील अनेक वार्डात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.अशातच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्याधिकारी, तहसीलदार व महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण चे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे.अशातच  पाणी मिळत नसल्याने एका 80 वर्षीय वृद्ध इसमाला बोरिंग हाताळताना जागीच मृत्यू झाला.त्यामुळं ही अतिशय गंभीर बाब असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page