*शक्ती मंच बल्लारपूर तर्फे दिल्ली येथे जंतर-मंतरवर होत असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सभा संपन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*
दिनांक 20 सात 2026 ला शक्ती मंच बल्लारपूर तर्फे दिल्ली येथे जंतर-मंतरवर होत असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्यामध्ये विविध संघटना, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, वकील व महिला हजर होत्या. या कार्यक्रमाची सुरवात नगर परिषद बल्लारपूरच्या नगराध्यक्षा डॉ अल्का वढाई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले,डॉ.जयप्रकाश तुंबडे, डॉ.श्वेता मानवटकर, अनिल वागदरकर,माजी उपाध्यक्ष नासिर खान,दीपक भाऊ धोपटे शाहिद शेख, प्रकृती पाटील मॅडम, शालिनी वावरे,बालाजी हायस्कूल येथील विद्यार्थिनी हिना खानके,किमया झांबरे, अंकित मळावी, शक्ती मंचच्या उपाध्यक्ष मीनाक्षी गलगट व सचिव शोमा लाकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जंतर-मंतर येथे होत असलेल्या काक्रोज जनता पार्टी यांनी केलेले आंदोलन व सोनंम वांगचुक यांनी केलेले आमरण उपोषण यांना समर्थन व त्यांनी केलेले केंद्रीय शासनाकडे मागण्या पूर्ण करण्याकरिता आजचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये शक्ति मंचाच्या अध्यक्षा एडवोकेट मेघा भाले,उपाध्यक्ष मीनाक्षी गलगट, सचिव शोमा लाकडे,सदस्य मीना बहुरिया,प्रियंका नाईक, सपना मोरे,परिणीता गायगोले, किरण बेलखंडे,शांती घुगलोत, धम्मदिनी तोहोगावकर, बबिता बाजपेयी, कीर्ती चावला, मनीष सेठी शशांक कोत्ताकोंडा, रोनीट गलगट,बबलू करमणकर, रेखा रामटेके, रेखा मेश्राम, तसेच बालाजी हायस्कूल बामणी येथील सर्व विद्यार्थी बेघर जनकल्याण सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित झाले त्यानंतर सर्व उपस्थित महिला युवक वर्ग व नागरिक बल्लारपूरच्या तहसीलदार मा. रेणुका कोकाटे यांना निवेदन दिले व दिल्ली येथे सुरू असलेले जंतर-मंतर वरील आंदोलनास आमचा समर्थन आहे तसेच त्यांनी मागणी केलेल्या मागण्या केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा तसेच नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी जिल्हाधिकारी मार्फत केंद्र शासनाकडे मागणी केली.