जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये “तंबाखू विरोधी दिनानिमित्त” दिनांक 8 मे 2024 रोज बुधवार ला सकाळी 9.30 वाजता तालुका विधी समिती बल्लारपूर तालुका विधिज्ञ संघ बल्लारपूर तसेच पोलीस स्टेशन बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत पळसगाव तालुका बल्लारपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून श्रीमती एस. एन. सावळेश्वरकर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती बल्लारपूर तर मार्गदर्शक म्हणून अधिवक्ता एस. जी. हस्ते होते प्रमुख उपस्थिती सौ. संगीता सोयाम सरपंच व श्री. नितीन वांढरे उपसरपंच ग्रामपंचायत पळसगाव होते. उपस्थित पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून अधिवक्ता एस. जी. हस्ते तालुका बार असोसिएशन बल्लारपूर यांनी आपल्या मार्गदर्शनात विशेषता युवा पिढीला संबोधून बोलले की, आजची युवा पिढी व्यसनांच्या अधीन गेलेली दिसून येते प्रत्येक ठिकाणी तंबाखूचे सेवन भरमसाठ प्रमाणात होत आहे. जे आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. नंतर सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मान्यवर श्रीमती एस. एन. सावळेश्वरकर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बल्लारपूर यांनी तंबाखू सेवन केल्याचे दुष्परिणाम बद्दल मार्गदर्शन केले. सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानले ह्या तंबाखू विरोधी दिनी मनात एक संकल्प घेऊन कार्यक्रमांचा उद्देश प्रतिसाद करावा व प्रत्येकाने व्यसन विरहित जीवन जगण्याचे व व्यसनग्रस्त व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांना व्यसनापासून परावर्तन करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान उपस्थितांना केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. बी. एन. विधाते अधिवक्ता व आभार प्रदर्शन श्री. आय. आर. सय्यद अधिवक्ता यांनी उत्कृष्टपणे केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस स्टेशन बल्लारपूर तसेच कार्यालयीन कर्मचारी सौ. वाय. पी. चिंतलवार वरिष्ठ लिपिक कु. पि. टी. पेटकर कनिष्ठ लिपिक, म. पो. शी. अर्चना बोरसरे यांनी मोलाचा सहभाग दिला.