Wednesday, August 19, 2026
spot_img
HomeJanjagruti*चंद्रपूर पोलीस दलाचा ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ उपक्रम, जिल्ह्यातील २०३ शाळांमध्ये ७५...

*चंद्रपूर पोलीस दलाचा ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ उपक्रम, जिल्ह्यातील २०३ शाळांमध्ये ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थ विरोधी शपथ*

*चंद्रपूर पोलीस दलाचा ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ उपक्रम, जिल्ह्यातील २०३ शाळांमध्ये ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थ विरोधी शपथ*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ अंतर्गत दिनांक: १८/०८/२०२६ रोजी जिल्ह्यातील एकूण २०३ शाळा व महाविद्यालयांमध्ये “Say No to Drugs” (अमली पदार्थांना नकार) या व्यापक जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची आणि नशामुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेण्याची सामूहिक शपथ घेतली.
*प्रमुख मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन :*
– *सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर* : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी पार पडला.
– *शिवाजी हायस्कूल, राजुरा* : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
– *बी.जे.एम. कार्मेल अकॅडमी, चंद्रपूर* : चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांनी स्वत: उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम समजावून सांगितले व शपथ दिली.
– *खत्री कॉलेज, चंद्रपूर* : उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेविरुद्ध जाणीव निर्माण करणे, त्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवणे आणि एक निरोगी, सुरक्षित पिढी घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार, मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी (नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच) आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप दिले.
‘नशामुक्त युवा, सशक्त भारत’ या संकल्पनेवर विश्वास ठेवत विद्यार्थ्यांनी स्वत: नशा न करण्याचा तसेच समाज आणि मित्र परिवारात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
चंद्रपूर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील युवक व विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी भविष्यातही विविध जनजागृती, शपथ व प्रतिबंधात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत.
*f :* SP Chandrapur | *📷 :* chandrapur_police | *X :* spchandrapur
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page