श्रेयश वानखेडे:
ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत स्वच्छता व नाली साफसफाई करणे व घनकचरा संकलन केंद्र हे कंत्राट काम श्री साई भूसंपदा कृषी उद्योग (खापा) कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडे नाली उपसा करण्यासाठी ४५ कामगार आहेत. या कामगारांना अंदाजपत्रकानुसार ७७६ रुपये मजुरी आहे. या रोजी मधून ईपीएफ ची रक्कम वजा करता उर्वरित रक्कम मजुरांना देणे आवश्यक असून मजुरी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. ही अट कंत्राटकामातील अटी शर्ती मध्ये नमूद आहे.
बऱ्याच महिन्यापासून कंत्राटदाराकडून कामगारांना नियमीत व योग्य मजुरी दिल्या जात नाही. तसेच कामगारांना लक्ष्य बनवून वारंवार विवीध कारणासाठी त्रास दिल्या जातो. या सर्व प्रकाराने, कंत्राटदाराच्या मुजरीने कंटाळून कामगारांनी एप्रिल महिन्यात ३ दिवस व चालू महिन्यांमध्ये २ दिवस असे एकूण ५ दिवस काम बंद ठेवले होते.
सदर कंत्राटदार मुजोर प्रवृत्तीच्या असल्याने व कामाचा योग्य मोबदला मजुरांना देत नसल्याने तसेच ५ दिवस काम बंद असल्याने सदरहू कंत्राटदारावर दंडासह कारवाई करण्याची मागणी नगर परिषदेच्या व कामगारांचे हिताचे दृष्टीने सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
*कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराकडे  हस्तांतरित करा*
 कंत्राटदार हा नियमित काम करत नसल्याने व अटी शर्तीतील उल्लंघन केल्यामुळे कंत्राट कामातील अटी शर्ती मधील नमूद केलेल्या दंडानुसार सदर कंत्राट दारावर दंड करण्यात यावे.  या मुजर कंत्राटदाराकडून कंत्राट बंद करावे व सदर कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराकडे  हस्तांतरित करावे, हे नगर परिषददेच्या व ब्रह्मपुरीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असेल.