*स्वसंरक्षण प्रशिक्षण व विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे चंद्रपूर पोलीस विभाग, पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांच्या सहकार्याने स्वसंरक्षण प्रशिक्षण व विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत जनजागृती रथामधील प्रोजेक्टरद्वारे सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती व महिला संरक्षण याविषयी माहितीपर व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
हेड कॉन्स्टेबल बळीराम पवार व पोलीस कॉन्स्टेबल नागेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
तसेच हेड कॉन्स्टेबल प्रवीण रामटेके, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक आडे,मार्शल आर्ट प्रशिक्षक वाजिद अली, मार्शल आर्ट चे विद्यार्थी साक्षी रणवीर, आर्यन रायपुरे, हसरत अली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देण्यात आली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थी व शिक्षकांना ‘सुरक्षा मंत्र’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.