Wednesday, January 14, 2026
HomeSanghtanaमराठा सेवा संघ तालुका बल्लारपूर, सभा संपन्न
spot_img

मराठा सेवा संघ तालुका बल्लारपूर, सभा संपन्न

मराठा सेवा संघ तालुका बल्लारपूर, सभा संपन्न

श्रेयश वानखेडे:
मराठा सेवा संघ तालुका बल्लारपूर व संभाजी ब्रिगेड बल्लारपूर चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक बांधवांची सहविचार सभा दिनांक २६ मे २०२४ ला, मा. शिवश्री दिपक खामनकर, जिल्हा अध्यक्ष, मराठा सेवा संघ, चंद्रपूर,यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेचे प्रास्ताविक करतांना  मा. शिवश्री मनोहर माडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष , मराठा सेवा संघ यांनी मराठा सेवा संघ स्थापना, उद्देश, उद्दिष्टे व कार्य तसेच सध्याचे परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी,या विषयावर सविस्तर माहिती दिली. या सभेत बल्लारपूर तालुका मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली, त्या मध्ये शिवश्री सुरेश पंदिलवार यांची तालुका अध्यक्ष पदासाठी व शिवश्री नितीन वरारकर यांची तालुका सचिव पदासाठी निवड करण्यात आली.
 या प्रसंगी मा. प्रा. एन. के. लिंगे, मा. प्रा. राजेंद्र खाडे, मा. राजेंद्र गौरकार , मा. मोहम्मद शरीफ, मा. चंद्रकांत पावडे, प्रणय वाटेकर, अतुल बांदुरकर, सुधिर कोरडे, राजेश बट्टे , विवेक खुटेमाटे, मा. साहिल घिवे शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सर्व कार्यकर्ते व सामाजिक हितचिंतक बांधवांची उपस्थिती लाभली.
सभेचे संचालन मा. शिवश्री अनिल वाग्दरकर यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page