Sunday, July 12, 2026
HomeGondpipari*गोंडपिपरी पोलिसाद्वारे अवैधरित्या कत्तलीसाठी नेणारे 03 गोवंशीय बैल, वाहन जप्त*
spot_img

*गोंडपिपरी पोलिसाद्वारे अवैधरित्या कत्तलीसाठी नेणारे 03 गोवंशीय बैल, वाहन जप्त*

*गोंडपिपरी पोलिसाद्वारे अवैधरित्या कत्तलीसाठी नेणारे 03 गोवंशीय बैल, वाहन जप्त* 

*ज्योत्स्ना वानखेडे*
दिनांक: 11/07/2026 रोजी 19:00 वाजता चे  सुमारास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मोजा दरूर गावामध्ये नाकाबंदी केली असता पिक अप क्रमांक MH 34 BZ 8389 या वाहनामध्ये आरोपी नामे महेश नीलकंठ बोरकुटे वय 36 वर्ष राहणार बोंडाळा तालुका मुल जिल्हा चंद्रपूर हा 03 गोवंशीय बैल अवैधरित्या, विनापरवाना कतलीकरिता तेलंगणा राज्यांमध्ये घेऊन जात असताना मिळून आला, त्याच्याकडे कोणतीही कागदपत्र मिळून आली नाहीत. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची जनावरे ही अमन खान राहणार तेलंगणा यांची असल्याचे सांगितले,
यावरून पिक अप वाहन किंमत 500000 रुपये ,03 बैल किंमत 60,000/- रुपये व एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रुपये असा एकूण 5,70,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 5A,5B,9,11 महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपअधीक्षक सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, Psi मंगेश कराडे, HC कृष्णा रॉय, पोलीस अंमलदार अनुप निकुरे, सचिन मोहरले, साईनाथ जुरे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page