सुरजागड लोह खनिज खाण प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करा :- राजेश बेले
श्रेयश वानखेडे:
सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेली लाल मातीचे कण व लोह दगडातील सुष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडत असल्यामुळे तेथील मानवी जीव, जल प्राणी, वन्य प्राणी , पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण नवजात शिशु चा मृत्यू, दमा, हृदय विकार, त्वचा रोग, डोळ्याचे विकार, मेंदूचे विकार, क्षयरोग, कर्करोग अशा अनेक आजाराची सुद्धा लागण झालेली आहे.
लोह खनिज हाताळनी करते वेळी हवेमध्ये सुष्म कण उडत असल्यामुळे घातक प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही. लोह खनिज खाणीतून निघणार्या लोह खनिज मधून निघणारा ओवर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये सुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
जड वाहतुकीद्वारा कायद्याचे उल्लंघन करून वाहतुकीमूळे सुरजागड लोह खनीज प्रकल्पापासून एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोम्भूर्णा, केळझर, कोठारी, बामणी या गावा आजूबाजूचा परीसर लोह खनिजाचे हवेमध्ये उडते सुष्म कणामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
लोह खनिज खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून नदीमध्ये सोडत असल्यामुळे घातक जल प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
सुरजागड लोह खनिज प्रकल्प केळझर व राजुरा रेल्वे सायडिंग वर लोह खनिज हाताळणी करते वेळी हवेमध्ये सुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पद्वारा पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. अशी मागणी राजेश वारलुजी बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी प्रेस नोट द्वारा केली आहे.