Saturday, August 29, 2026
spot_img
HomeSanghtanaप्रकाश देवतळे यांची भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड आ. किशोर जोरगेवार यांनी...

प्रकाश देवतळे यांची भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड आ. किशोर जोरगेवार यांनी केला सत्कार.

प्रकाश देवतळे यांची भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड आ. किशोर जोरगेवार यांनी केला सत्कार.

*Jyotsna Wankhede*:भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल चंद्रपूर महानगर भाजपच्या वतीने भाजप चंद्रपूर महानगर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकाश देवतळे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रकाश देवतळे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर झालेली निवड ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी तसेच भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक संघटनेसाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या देवतळे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद वाढविण्यात तसेच पक्षाचा विचार आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रकाश देवतळे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याने चंद्रपूरच्या कार्यकर्त्यांमध्येही नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले. यावेळी प्रकाश देवतळे यांनी सत्काराबद्दल आमदार किशोर जोरगेवार आणि चंद्रपूर महानगर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्कार कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, नगरसेविका सविता कांबळे, शीतल गुरनुले, सरला कुळसंगे, ज्योती जिवणे, अमोल शेंडे, नकुल वासमवार, धनराज जिवणे, राकेश बोमनवार, गौरव जोरगेवार, ईश्वर वाघमारे, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page