Tuesday, August 25, 2026
spot_img
Homeबल्लारपूरओबीसी समन्वय समिती द्वारा बल्लारपुरातील समस्यांचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन

ओबीसी समन्वय समिती द्वारा बल्लारपुरातील समस्यांचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन

ओबीसी समन्वय समिती द्वारा बल्लारपुरातील समस्यांचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन

श्रेयश वानखेडे:

बल्लारपुर येथे मान. प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र खासदार यांचा  बल्लारपूर येथे  भव्य सत्कार  समारंभ  वस्ती विभाग गांधी पुतळ्याजवळ संपन्न झाला. यावेळी ओबीसी समन्वय समिती व्दारे निवेदन देण्यात आले. आज  बऱ्याच दिवसापासून स्थानिक समस्या आहे .

बल्लारपुरातील वाहतुक व्यवस्था नवीन ठाणेदार आल्यापासून बिघडली आहे. शहरात 9 ट्राफिक पाॅईंट आहे. पण शहरात दोनच ट्राफिक पोलीस दिसतात कींवा एकही दिसत नाही. शहरात 6 पोलीस चौक्या पैकी तीनच  पोलीस सुरू आहे. टेकडी विभागात पोलीस चौकीची गरज आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्गावर २४ तास मोठे ट्रक उभे राहतात. यामुळे पैदल कोठुन जावे हा प्रश्न वरिष्ठ नागरीकांना पडतो. पोलीस कार्यवाही करीत नाही. 20 वर्षांपासून बायपास ची मागणी आहे ती पुर्ण झाली नाही. आमदार   सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी म्हटले होते की, नवीन पाणी पुरवठा योजना पुर्ण झाली की, 24 तास पाणी मिळेल ही योजना सद्या पुर्ण झाली आहे. पण शहराला एक तासच पाणी मिळते व गेल्या 30 वर्षांपासून पाणी टंचाई चा सामना  नळ ग्राहकांना करावा लागत आहे.

पावसाळा सुरू होत आहे पण नगरपरिषद नाले सफाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातून गेलेल्या दोन्ही बाजुच्या नाल्या एक वर्षांपासून साफ करण्यात आल्या नाही. व रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण 6 वर्षांपासून हटवले नाही, यामुळे अपघात होत आहे. चालण्यासाठी जागा ठेवण्या पुरते नगरपरिषद ने दुकानदारास त्रास न देता हटवावे. गेल्या 5 वर्षांपासून शहरातील रस्ते उखडलेले आहे नगर परिषद  लक्ष देत नाही.

जलजीवन नळ योजना गेल्या 6 वर्षांपासून तालुक्यातील 18 गावात पोहचली नाही. ती लवकर पुर्ण व्हावी व 20 वर्षांपासून पळसगाव-आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील हजारो शेतकऱ्याच्या शेतात पोहचले नाही लवकर पुर्ण करण्याची मागणी केली आहे.  तसेच  पावसाळा सुरू होत आहे तरी पण शेतकऱ्यांना पांदण रस्ते अजून मोकळे झाले नाही. शेतकऱ्यांना अवजारे व बियाणे नेण्यास अडचण होत आहे.

तरी या स्थानिक मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देऊन येणाऱ्या काळात समस्याचे समाधान करू असे आश्वासन देण्यात आले. निवेदन देताना ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक जगन्नाथ खुटेमाटे, घनश्याम लांडे, प्रणय काकडे, पवण मेश्राम, राकेश वडस्कर, अमोल काकडे, केशव थिपे, कैलास धानोरकर, कुणाल कवरासे तसेच मोठ्या संख्येने ओबीसी  बांधव उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page