ज्योत्स्ना वानखेडे:
श्रीमती कल्पना दुर्वास ईखारकर,पत्नी मयत शिक्षक दुर्वास रामजी ईखारकर महात्मा गांधी विद्यालय,वानाडोंगरी,अनुकंपा नियुक्ती ही शासनाची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन करण्यात येणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. पती स्व. दुर्वास रामजी ईखारक, शिक्षक यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबावर आर्थिक अडचणींचा मोठा भार पडलेला आहे.मुलगा धिरज दुर्वास ईखारकर (बी इ सिव्हिल)हा शाळेत दि: १७ ऑक्टोबर २०२५ पासून लिपिक या पदावर रुजू झालेला आहे,त्याच्या अनुकंपा नियुक्तीस मान्यता मिळावी यासाठी दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रस्ताव मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे सादर करण्यात आला आहे.शासन निर्णय दिनांक २७ जानेवारी २०२६,पुढील कार्यवाहीसाठी योजना विभागाकडे पाठविण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तथापि, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
शासन निर्णय दिनांक २७ जानेवारी २०२६ मधिल पान क्रमांक दहा फ) इतर तरतुदी उतारा क्रमांक एक मध्ये ” हा शासन निर्णय अंमलात येण्यापूर्वी अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याने त्यास शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर २००२ अन्वये निर्णय घेणे अपेक्षित आहे परंतू लिपिक पदावर मान्यता देण्यात आली नाही.
उपोषणातुन श्रीमती कल्पना दुर्वास ईखारकर, संबंधित दोन्ही विभागांनी समन्वयाने या प्रकरणातील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून अनुकंपा नियुक्तीस मान्यता प्रदान करण्याची कार्यवाही करण्यात यावी,ही या निवेदनाच्या आधारे मागणी करण्यात आली आहे.
उपोषणास सहकार्य करण्यासाठी खाजगी शाळा शिक्षक संघाचे सर्वश्री प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, पितांबर गायधने, पुरूषोत्तम मौंदेकर, ज्ञानेश्वर वाघ, पुरुषोत्तम कामडी, ज्ञानेश्वर डायगव्हाने, धनराज वैद्य, ज्ञानेश्वर घंघारे, काशिराम बोपचे, उग्रसेन देऊळकर व निलेश बाथो उपस्थित होते.