Wednesday, February 11, 2026
HomePoliceपोलिस स्टेशन येथे तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक
spot_img

पोलिस स्टेशन येथे तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक

पोलिस स्टेशन येथे तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे आगामी बकरी ईद निमित्त तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक चे आयोजन करण्यात आले.
          १७ जुन रोजी होत असलेल्या  बकरी ईद निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे तसेच प्रभारी तहसीलदार सतिश साळवे  बल्लारपूर  यांचे उपस्थितीत तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
         सदर बैठकीत बकरी ईद सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच ईद नमाज पठणानंतर मुस्लिम रिती नुसार होणारी कुर्बानी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले परिपत्रकात नमूद जनावरांच्या वाहतूकी व कत्तली संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
           या बैठकीत डॉ. डी. पी.जुमळे पशु वैद्यकीय अधिकारी,बल्लारपूर, जयंत कातकर उप मुख्याधिकारी न.प.बल्लारपूर, जिल्हा शांतता समिती सदस्य  काशिनाथ सिंह, नासिर मोहम्मद रहीम
बक्स (भुरुभाई), बल्लारपूर ऍड.हरिश गेडाम रा.बामणी तसेच तालुका स्तरावरील शांतता समिती सदस्य भारत थुलकर, वसंत खेडेकर, राजू झोडे, शिवचंद द्विवेदी, शेख उस्मान शेख गुलजार, नरेश मुंदडा, ताहीर हुसेन, देवेंद्र आर्य, पवन भगत, ऍड. मेघा भाले, आसिफ अब्बास शेख, मनोहर दोतेपल्ली, सौ. मिनाक्षी गलगट, सौ. ज्योती गेहलोत, सौ.कल्पना  गोरघाटे, राजेश खेडेकर सहित तालुका शांतता समितीचे सदस्य, पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रिडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोयर, सफौ गजानन डोईफोडे, साईनाथ आत्राम सह पोलीस स्टाफ उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page