Saturday, March 14, 2026
Homeबल्लारपूरहाथरस मधील मृतकांना युवक काँग्रेस तर्फे श्रद्धांजली
spot_img

हाथरस मधील मृतकांना युवक काँग्रेस तर्फे श्रद्धांजली

हाथरस मधील मृतकांना युवक काँग्रेस तर्फे श्रद्धांजली

श्रेयश वानखेडे: 
हाथरस मधील चेंगराचेंगरीत  मृत्यू झालेल्या भाविकांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने श्रद्धांजली वाहिली.
          उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मंगळवारी एका धार्मिक समारंभादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११६ भाविकांचा मृत्यू झाले. उत्तर प्रदेश पोलीसांनी त्या कथित धर्मगुरू बाबा नारायण हरी यांना आरोपी न करताच आयोजकांवर कारवाई केली आहे. आयोजकांनी कार्यक्रमासाठी ८०,००० भाविकांची परवानगी घेतली होती आणि त्यानुसार कार्यक्रमाचं  व्यवस्थापन करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रमात २.५ लाख लोक उपस्थित राहिल्यानं गर्दी प्रमाणाबाहेर वाढली आणि वाहतुक कोंडी झाली. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडणाऱ्या भाविकांची गर्दी आयोजकांना नियंत्रित करता आली नाही आणि खाली बसलेले अनेक भाविक चेंगरले गेले.
      महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव चेतन गेडाम यांचा नेतृत्वात जुनी नगर परिषद जवळ मृतकांना श्रद्धांजली वाहत उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सरकार चा निषेध केला.
    या वेळी ज्येष्ठ नेते घनश्याम मूलचंदानी, देवेंद्र आर्य, राजु झोडे, मेहमूद खान पठान, चेतन गेडाम, अरबाज सिद्दकी, अरविंद वर्मा, रूपेश भोयर, मुकद्दर शेख, सुनील वर्मा, अक्षय देरकर, साहिल सिद्दीकी, रूपेश रामटेके, नन्ना लाहोरे, रोशन गिरी, दुर्गेश पवार,भोला भड़के, रोहन मेश्राम, ऋतिक गवई, विवेक खुटेमाटे, गोकुळ भालेराव, सुरेश बोप्पनवार, अक्षय अरेकर, रोशन हेगड़े, शोहेल खान, वाजिद शेख, कैलाश धानोरकर, सैजाद खान, नावेद शेख, मोविल सिद्दीकी, दीपक जिल्लाला सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page