Tuesday, July 28, 2026
HomeSportमोन्टफोर्ट शाळा बामणी, येथे स्पोर्ट मीट संपन्न
spot_img

मोन्टफोर्ट शाळा बामणी, येथे स्पोर्ट मीट संपन्न

मोन्टफोर्ट शाळा बामणी, येथे स्पोर्ट मीट संपन्न

श्रेयश वानखेडे:
मोन्टफोर्ट शाळा बामणी येथे स्पोर्ट्स मीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात 100 मी.200 मी. 400 मी. 800 मी.शॉटपुट, डिस्कस थ्रो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अशा विविध इव्हेंटचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मा.चंदनसिंह चंदेल ,(माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ,) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रोवेंशियल शाईन ॲलेक्स,  तसेच एड. रनंजय सिंग उपस्थित होते. सदर कार्यक्रम तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे घेण्यात आला भव्य अशा स्टेडियम मध्ये विद्यार्थ्यांनी मनमोहक पणे अति उत्साहाने स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 700 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक ब्रदर प्रेम कुमार यांनी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून एक नवीन उपक्रम घेण्याचे ठरविले. ब्रदर जेरोमिया,ब्रदर अँटोनी यांच्या सह शाळेचे क्रीडा शिक्षक श्री दयानंद येरा,श्री किशोर मोहुर्ले, सौ रोहिणी वालोकर यांनी पुढाकार घेत सर्व शिक्षकांना समावेश करून त्यामध्ये प्रकाश राव, विजय दिकोंडावार,आशिष चक्रवती, राजेश केथवास , घनश्याम बुरडकर, रजनी वाडके, सागर राहुड,स्वाती टीचर,प्रेमलता टीचर,करूना टीचर,अश्विन टीचर, वराप्रसादसर, आदि शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page