Tuesday, January 20, 2026
HomeEducationमाध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाला महाराष्ट्र राज्य माहिती आयोग...
spot_img

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाला महाराष्ट्र राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांचा दणका

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाला महाराष्ट्र राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांचा दणका

माजी जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल व उपविभागीय अधिकारी अजित पवार यांचे प्रकरण पुन्हा चर्चेत

श्रेयश वानखेडे:

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मनमानी आणि आपल्याच मनाने भोंगळ कारभार चालू असल्यामुळे पुन्हा हे कार्यालय माहिती अधिकार कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे.
या कार्यालयात माहितीचा अधिकार 2005 चे कोणतीही अंमलबजावणी होत नसून, जिल्हा परिषद चंद्रपूर वर असलेल्या  माध्यमिक शिक्षण विभागाचा पोर्टलवर सुद्धा माहिती अद्यावत नाही. माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचे फक्त नाव आहे आणि मोबाईल नंबर दुसऱ्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याचा आहे.
अपिलार्थी राजू किसनराव वानखेडे यांनी मूळ माहिती अर्ज दिनांक: 15/01/ 2024 रोजी माहितीचा अधिकार कायदा वापरून माहिती मागितली होती. त्या माहिती अधिकाराच्या अर्जाला या कार्यालयाने केराची टोपली समजून घेतल्यामुळे, प्रथम अपील दिनांक: 26/02/2024 रोजी दाखल केले आणि प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी त्यावर कोणताच  निर्णय न दिल्याने द्वितीय अपील क्रमांक 1062/ 2024  महाराष्ट्र राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर येथे दिनांक: 22/04/2024 रोजी दाखल करण्यात आले.
या कार्यालयात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी एकच असून ते पण सोडायला तयार नाही.
खरे तर त्यांनी आपल्या अपेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला माहिती अधिकारी बनवायला पाहिजे होते. परंतु ते हे पद का सोडत नाही हे एक रहस्यमय बाब दिसून येत आहे.
या प्रकरणात शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना आयोगाने कळविले आहे की, अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या दिनांक: 26/02/ 2024 रोजीच्या प्रथम अपील अर्जावर सदर आदेश प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत सुनावणी घेऊन निर्णय पारित करण्यात यावा.
असा आदेश  मान. राहुल भा. पांडे राज्य माहिती आयुक्त   खंडपीठ नागपूर यांनी  दिनांक: 29/04/2024 रोजी पारित जावक क्रमांक:4884 दिनांक: 01/08/ 2024 रोजी पाठवला आहे.
त्यामुळे या कार्यालयाची हवा गोल झाली असून, सन 2005 मधील प्रकरणात मान. संजीव जयस्वाल जिल्हाधिकारी आणि मान. अजित पवार उपविभागीय अधिकारी यांना ज्याप्रकारे लोकसेवा आयुक्ताने कान पकडून  राजू वानखेडे यांचे काम करण्यास भाग पाडले. तीच वेळ आता माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाचे अधिकाऱ्यांवर आलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page