Sunday, September 20, 2026
spot_img
HomeEducationकर्मचारी निलंबन प्रकरणी शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा हायकोर्टाचा नुकताच निकाल

कर्मचारी निलंबन प्रकरणी शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा हायकोर्टाचा नुकताच निकाल

कर्मचारी निलंबन प्रकरणी शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा हायकोर्टाचा नुकताच निकाल

राष्ट्रमाता महाविद्यालय, जालना, प्रकरण

प्राध्यापकाला चुकीच्या पद्धतीने/दादागिरी करून निलंबित/बडतर्फी केल्यानंतर सर्व वेतन संस्थाचालकाने  स्वतः द्यावे, शासनाचा संबध नाही. कोर्टाची संस्थाचालकावर अत्यंत ठोस आर्थिक कारवाई

श्रेयश वानखेडे:
1- एरव्ही पूर्वग्रहदूषित वृत्तीने व  आपले काय जाते केवळ कर्मचाऱ्यांना आर्थिक,मानसिक त्रास देण्याच्या हेतूने कर्मचाऱ्यांचे निलंबन/ बडतर्फ कारवाई करणारे काही संस्थाचालक व प्राचार्यांना आज उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लावली आहे.
2- निलंबन व बडतर्फचा बेकायदेशीर आगाऊपणा संस्थेने केला मग निलंबन/बडतर्फ कालावधीतील वेतन तुम्हीच द्या शासनाचे उत्तरदायित्व नाही असा ऐतिहासिक निकाल आज औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला.
3- तत्पूर्वी मा. ट्रीबुनलने असा निकाल दिल्यावर बडतर्फ कालावधीचे वेतन आम्ही न देता शासनाने द्यावे म्हणून दाखल संस्थाचालकाची याचिका मा. उच्च न्यायालयाने फेटाळली. व ते वेतन संस्थेने द्यावे हा निकाल कायम ठेवला.
4. सगळ्यात महत्वाचे प्राचार्य व संस्थेचे पत्रे न स्वीकारणे किंवा त्यांना उत्तर न देणे हा शिस्त अननुपालन किंवा misconduct गैरवर्तन सदरात येत नसल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
5. तसेच 2004,2014 चे जुनी प्रकरणाच्या आधारावर आरोपपत्र बनवणे व त्याचा आधार घेऊन चौकशी समितीने अहवाल देणे हे पूर्णतः एकांगी,बेकायदेशीर ,पूर्वग्रहदूषित व ठरवून केलेली कृती असल्याने तो कर्मचाऱ्यां विरुद्ध कारवाईचा आधार होऊ शकत नाही.
थोडक्यातहा निकाल एक directive म्हणून  शिक्षण क्षेत्रात दिलासा देणारा असून काही संस्थाचालक व प्राचार्य यांना चपराक देणारा आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page