*ज्योत्स्ना वानखेडे*:
मागील अनेक दिवसापासून पालकांकडून मागणी होत होती की, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल याचे एकच प्रवेशद्वार असून ते देखील राष्ट्रीय महामार्ग यावरच असल्यामुळे विद्यार्थ्यांना या मार्गावरून विपरीत दिशेने शाळेत ये – जा करावी लागते व त्यामुळे या मार्गावरून अनेक जड वाहनांची रहदारी असल्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना, व शिक्षकांना देखील या महामार्गावरील जड वाहनांच्या वरदळीमुळे भविष्यात मोठ्या अपघाताची भीती असल्यामुळे पालकांच्या वतीने दिनांक 12/09/2026 ला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी शाळा प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली आहे की, लवकरात लवकर हायवेच्या विपरीत दिशेला पर्यायी प्रवेशद्वाराची (गेट) व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून शाळेची वाढलेली ख्याती त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
अनेक विद्यार्थी विवेकानंद वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, विद्यानगर वार्ड, शिवनगर वार्ड, कन्नमवार वार्ड, गोकुळ नगर वार्ड, या आणि इतर परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येतात अनेक विद्यार्थी व पालक हायवेला फुटपाथ नसल्याने मुख्य रस्त्यावरून विपरीत दिशेनेच ये – जा करतात.
काही दिवसापूर्वी नुकत्याच झालेल्या अपघातात एका पिकप वाहनाने अनेक लोकांना अपघात करून जखमी केले व त्यात काही लोक गंभीर जखमी झाले व एका मेडिकल संचालकाचा मृत्यू देखील त्यात झाला यामुळे आता भीती अधिकच बढावली असल्याने आज निवेदन देऊन शाळा प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की लवकरात लवकर हायवेच्या विपरीत दिशेला पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करावी.
यापूर्वी देखील अनेक वर्षापासून शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी शाळा प्रशासन तसेच गटशिक्षणाधिकारी (बी. इ. ओ.) बल्लारपूर यांच्या माध्यमातून मौखिक विनंती केली. तरीदेखील शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी पालकांच्या वतीने लेखी निवेदन देऊन मागणी केलेली आहे अशी माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.