Thursday, June 11, 2026
HomePoliceदुर्गापूरातून दोन गुन्हेगारांना तडीपार! : पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा गुन्हेगारांना दणका
spot_img

दुर्गापूरातून दोन गुन्हेगारांना तडीपार! : पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा गुन्हेगारांना दणका

दुर्गापूरातून दोन गुन्हेगारांना तडीपार! : पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा गुन्हेगारांना दणका

श्रेयश वानखेडे:
आगामी  सण, उत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्यात येत आहे.
        दुर्गापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी दुर्गापूर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार दुर्गाप्रसाद ‘सदुजी धुर्वे वय ३१ वर्ष रा. समतानगर वार्ड नंबर ६ उर्जानगर, रुपेश गणेश शाहु वय २४ वर्ष रा. समतानगर वार्ड नंबर ६ उर्जानगर’, या दोघांना चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपूर यांना पाठवले होते. सदर प्रस्ताव मंजूर करून दुर्गाप्रसाद सदुजी धुर्वे याला १ वर्षासाठी तसेच रूपेश गणेश शाहु, याला ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
         यापुर्वी सुध्दा पो.स्टे.दुर्गापूर हद्दीतील धोकादायक व रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत अरुण फुलकर वय ३५ वर्ष रा. सुमीत्रानगर तुकूम चंद्रपूर आणि रोहीत आदेश ईलमकर वय २५ वर्ष रा. समतानगर वार्ड नंबर ६ उर्जानगर, यांना १ वर्षासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने पोलीस स्टेशन दुर्गापूर हद्दीतील गुन्हेगारात चांगलीच दहशत पससली आहे.
       सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, दुर्गपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लता वाडीवे, दुर्गापूर येथील डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोहवा. योगेश शार्दुल, पोअं. प्रमोद डोंगरे, मंगेश शेंडे, किशोर वलके, मनोहर जाधव, सपंत पुलीपाका यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page