Wednesday, February 11, 2026
HomeJayantiस्व. जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन साजरा
spot_img

स्व. जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन साजरा

स्व. जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन साजरा

श्रेयश वानखेडे:
          दिनांक 23 ऑगस्ट 2024 ला स्व. जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंती दिनानिमित्त कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. सुभाष हाल बल्लारपूर येथे जयंती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर तसेच औषधी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मान. वसंतजी खेडेकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून पेपर मिल मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी मान. श्री वसंतजी मांढरे , जनविकास सेनेचे अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पू देशमुख ,बल्लारपूर  नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद उर्फ सिकी यादव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे वृक्ष व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
       स्वर्गीय जनार्दन कडू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून जनार्दन कडू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक भाषणामध्ये उमेश कडू यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत कार्यक्रमाचे हेतू समजून सांगितला जनसामान्यांमध्ये आपल्या जन्मदात्यां विषयी आदरभाव व स्नेह सदा असावे. त्यांच्या त्यागाची जाणीव आजीवन असावी. या संकल्प भावनेला बढावण्याकरिता अशा कार्यक्रमांचा उपयोग समाजामध्ये तरुण पिढीमध्ये प्रबोधनाच्या उपयोगी होऊ शकतो. असा आशावाद व्यक्त केला नंतर सर्व मान्यवरांनी आयोजित कार्यक्रमाची स्तुती करीत स्वर्गीय जनार्दन कडू हे यांना विनम्र अभिवादन केले.
       आरोग्य तपासणी शिबिरासाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष मान. संदीप देव आणि त्यांच्या गृपचे डॉक्टर सुषमा लीडर, डॉ. देवाशिष राय, डॉ. नीलिमा अलगामकर व पॅथॉलॉजिस्ट श्री विशाल पवार व सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. मान्यवर डॉक्टरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच काही शहरातील सन्माननीय नागरिकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामाताई भाले,माजी महिला व बालकल्याण सभापती सुवर्णाताई मुरकुटे, रेखाताई पागडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल वंगलवार व आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कडू मित्र परिवाराचे बल्लारपूर शहराचे ब्रँड अँबेसिडर मोहम्मद शरीफ सर, समशेर सिंह चव्हाण, नारद प्रसाद, प्रकाश तावडे, एमाजी कोठारकर, प्रियंकेश शिंगाडे, शंकरजी अडवाणी यांचे सहकार्य लाभले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page