विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्याला अटक
श्रेयश वानखेडे:
बस मध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी बल्लारपूरचा रेल्वे अधिकाऱ्याला अटक करण्यात आले आहे.
काल दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी बल्लारपूर येथून चंद्रपूर महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा चालत्या बसमध्ये बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या ५२ वर्षीय मिर्झा बेग उप स्टेशन प्रबंधक या अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयात ला जात असताना आणि परत येत असताना त्याच रेल्वे अधिकाऱ्याने विद्यार्थिनींच्या विनयभंग केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना बल्लारपूर बसस्थानकात बोलावून घेतले. सर्व पालकांनी मिळून त्या रेल्वे अधिकाऱ्याला चांगला प्रसाद देऊन बल्लारपूर पोलिस स्टेशनला नेले. त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी बल्लारशाह रेल्वे स्थानक चे अधिकारी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. पोलिसांनी मिर्झा बेग आरोपींविरुद्ध पॉस्को (८) व ७५ (२) बी एन एस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहे.
विनयभंगच्या वाढत्या घटना पाहता महिला व विद्यार्थिनी सुरक्षित रहावे. तसेच सोशल मीडिया पासून दूर राहण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी केले आहे.