फिर्यादींनी दिलेल्या रिपोर्टनुसार, *दि. 24/07/2026 रोजी सायंकाळी 05:00 वा.* सुमारास बस स्थानक चंद्रपूर येथे बि बियाणे खरेदीसाठी आले असताना अनोळखी दोन लोकांनी फिर्यादी जवळ येऊन “तुझ्या खिशात काय आहे दाखव” असे म्हणून फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशात जबरदस्तीने हात घालून त्याचे पॅन्टच्या खिशात असलेली प्लॅस्टिक पिशवी मधील *रोख रक्कम 20,000/- रुपये* व सोबत असलेला *आधार कार्डची झेरॉक्स असलेली प्लॅस्टिक पिशवी* जबरीने हिसकावून घेऊन पळून गेले.
फिर्यादी हा त्याचे पाठीमागे धावला असता परंतु जवळच मोटार सायकल घेऊन थांबलेल्या त्याचे साथीदारासह मोटार सायकलवर बसून पळून गेले.
अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस ठाणे रामनगर येथे *अपराध क्र. 942/26 कलम 304(1)(2), 3(5) भा.न्या.सं.* अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
*आरोपींना अटक:*
सदर प्रकरणाची माहिती मिळताच फिर्यादीकडे आरोपींचे वर्णनाबाबत माहिती घेऊन मा. पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके मॅडम* यांनी गुन्हे शोध पथकास आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केले.
गोपनिय माहिती घेतली असता सदरचा गुन्हा खालील 2 आरोपींनी केला असल्याचे निष्पन्न झाले:
त्यांनुसार पोलीस पथकाने तपास कौशल्याचा वापर करून *3 तासाच्या आत* आरोपींचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात अटक केली. त्यांचेकडून त्यांची जबरीने चोरलेली *रोख रक्कम 20,000/- रुपये* व फिर्यादीच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत हस्तगत करून जप्त केली.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी* सा.,
मा. अपर पोलीस अधीक्षक *श्री. ईश्वर कातकडे* सा.,
मा. पोलीस उपविभागीय अधिकारी *श्री. प्रमोद चौगुले* सा. यांचे सुचना व मार्गदर्शनामध्ये
पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके* मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये गुन्हे अन्वेषण पथकातील सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, सफौ प्रकाश बल्की/618, पोहवा आनंद खरात/1165, पोहवा रामप्रसाद नैताम/1306, पोहवा जितेंद्र आकेरे/566, पोहवा बाबा नैताम/2253, पोहवा रविकुमार ढेंगळे/847, मपोहवा मनीषा मोरे/462, पोअं प्रकाश मडावी/2708, पोअं. पंकज ठोंबरे/1230, पोअं. सुरेश कोरवार/2291, पोअं पंकज पोंदे/734, पोअं संदीप गेडाम/1304, पोअं सुरज शेडमाके/1303, मपोअं ब्ल्यूटी साखरे/2653 यांनी केलेली आहे.