Tuesday, January 20, 2026
HomePunyatithiमातोश्री विद्यालयात स्व. ॲड. भ. सो. उर्फ अण्णाजी खनके यांच्या पुण्यतिथी ...
spot_img

मातोश्री विद्यालयात स्व. ॲड. भ. सो. उर्फ अण्णाजी खनके यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

मातोश्री विद्यालयात स्व. ॲड. भ. सो. उर्फ अण्णाजी खनके यांच्या पुण्यतिथी  कार्यक्रम संपन्न

मातोश्री ज्ञानपीठातून समाजोपयोगी  नागरिक निर्माण व्हावा –   प्रा.सूर्यकांत खनके 

श्रेयश वानखेडे:
  स्थानिक गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित मातोश्री बालवाडी, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच मातोश्री अकॅडमी येथे संस्थेचे आद्य संस्थापक ॲड. भ.सो.उर्फ अण्णाजी खनके यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित गाथा थोर शास्त्रज्ञाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲड. रवींद्र खनके तर उद्घाटक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्रा.सूर्यकांत खनके लाभले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्वधर्मसमभाव व अण्णाजीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
   प्रा. सूर्यकांत खनके यांनी त्यांच्या स्मृतीस उजाळा देताना म्हणाले की, तुकूम परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने अण्णाजींनी समाजातील अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मातोश्री नावाने ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली. या ज्ञानपीठातून समाजोपयोगी  नागरिक निर्माण व्हावा, त्याचे विचार समाजासाठी आदर्श असावेत ज्ञानपीठाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या  सर्वांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. अण्णाजीनी  सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. जनसामान्यांची सेवा करण्यासाठी विधी शाखेतील पदवी प्राप्त केली. स्पर्धात्मक व संघर्षात्मक जीवनाला प्रामाणिकपणे, आत्मविश्वासाने व खंबीरतेने  पुढे गेले. मनुष्य हा जन्माने, जातीने व धनाने श्रेष्ठ – कनिष्ठ ठरत नसून स्वतःच्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरत असतो. तो स्वतःच आपल्या भाग्याचा निर्माता असतो. अशी त्यांची धारणा होती. आई हाच त्यांचा परमेश्वर आणि आई हेच त्यांचे दैवत आहे. चंद्रपूर येथील महानगरपालिकेचे प्रमुख असताना. समाजोपयोगी अनेक काम त्यांनी पूर्णत्वास नेली.
        या कार्यक्रमाची औचित्य साधून  गाथा थोर शास्त्रज्ञाची या उपक्रमांतर्गत नाटकीकरणाद्वारे सादरीकरण करण्यात आले.
  आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
  या कार्यक्रमाला गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्षा प्रा. जयश्रीताई खनके, सदस्य भूपेंद्र खनके, ॲड.केतन खनके, सौ सुषमा खनके, प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका संध्या वाढई, माजी मुख्याध्यापिका स्मिता पाचपोर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बसुने, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय बिजवे, पर्यवेक्षक प्रवीण रोकमवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page