*ज्योत्स्ना वानखेडे*
1. *गुन्हा क्रमांक:* 702/2026 कलम 8(क), 22(ब), 29 एन.डी.पी.एस. सह कलम 95 भा.न्या.सं.
2. *फिर्यादी:* शासन तर्फे पो.उप.नि. संतोष नारायण केदार, पोलीस स्टेशन भद्रावती
3. *आरोपी:* 1) विधिसंघर्षग्रस्त बालक – वय 16 वर्षे 11 महिने, रा. भद्रावती
4. *घटनेची तारीख व वेळ:* दिनांक 27/07/2026, रात्री 20.00 ते 21.20 वा.
5. *गुन्हा दाखल तारीख व वेळ:* दिनांक 27/07/2026, रात्री 23.37 वा.
*जप्त केलेला मुद्देमाल – एकूण किंमत रु. 23,000/-*
1. *5.21 ग्रॅम एम.डी. (Mephedrone) ड्रग्ज पावडर* – किंमत रु. 13,000/-
2. *1 जुना वापरता निळ्या रंगाचा रिअलमी कंपनीचा मोबाईल* – किंमत रु. 10,000/-
*हकीकत काय आहे?*
गुप्त बातमीदाराकडून भद्रावती बस स्टॉप येथे एक मुलगा एम.डी. ड्रग्ज पावडर बाळगून असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून पंचासमक्ष छापा टाकून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे *5.21 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर* व *एक रिअलमी मोबाईल* मिळून आला.
विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल साहेब यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. योगेश्वर पारधी, सपो.नि. विरेंद्र केदारे, सपो.नि. संजय मिश्रा, पो.उप.नि. संतोष केदार आणि भद्रावती पोलीस स्टेशनच्या स्टाफने ही कारवाई केली.