Sunday, April 19, 2026
HomePunyatithiजनता विद्यालयात स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली
spot_img

जनता विद्यालयात स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली

जनता विद्यालयात स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली

Shreyash Wankhede:
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे 27 मार्च रोजी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय श्रीहरी बळीरामजी जीवतोडे गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी. के. लांडे अध्यक्षस्थानी होते तर पर्यवेक्षक आर. आर. निखाडे, पाळी प्रमुख डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते जेष्ठ शिक्षिका डी. एम. मीनमुले, ग्रंथपाल पी. एम. सातपुते मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या फोटोला हार तथा दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक आर. आर. निखाडे आणि ग्रंथपाल पी. एम. सातपुते यांनी शिक्षण महर्षी जीवतोडे गुरुजी  यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
       त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बी. के. लांडे यांनी शिक्षण महर्षी श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरुजी यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण महर्षी श्रीहरी  जीवतोडे गुरुजी यांनी विदर्भामध्ये शिक्षणाची गंगा कशाप्रकारे आणली यासाठी त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत  प्रबोधन केले.
     कार्यक्रमाचे संचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी तहजिब शेख तर आभार अनुष्का उराडे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page